
गोकुळचा निकाल आज! कोणाची सत्ता, कोणाला धक्का?
कोल्हापूरच्या राजकारणात प्रतिष्ठेची लढत ठरलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी 99.74 टक्के मतदान झालंय… एकूण ५ हजार ४१८ मतदारांपैकी ५ हजार ४०४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय…महायुती आणि समविचारी आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. त्यातच महायुतीच्या नेत्यांनी यल्लम्मा देवी आणि बाळूमामाच्या मंदिरात जाऊन घेतलेल्या शपथेमुळे निवडणुकीची चर्चा आणखी रंगली. गोकुळची सत्ता नेमकी कोणाच्या हातात जाणार? कोणाचं राजकीय वर्चस्व सिद्ध होणार? आणि आजचा निकाल जिल्ह्याच्या राजकारणाला कोणती दिशा देणार? याकडे आता संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचं लक्ष लागलंय…




