२१ ऑक्टोबरपासून कोकण मार्गावर धावणार्‍या रेल्वेगाड्यांची वेगमर्यादा वाढणार


कोकण मार्गावर पावसाळी वेळापत्रकाच्या अंमलबजावणीमुळे १५ जूनपासून गाड्यांचा वेग मंदावलेला आहे. हे पावसाळी वेळापत्रक २० ऑ क्टोबर रोजी संपुष्टात येणार असून २१ ऑक्टोबरपासून कोकण मार्गावर धावणार्‍या रेल्वेगाड्यांची वेगमर्यादा वाढणार आहे. पावसाळ्यात अतिवृष्टी, दरडी कोसळण्याचा धोका लक्षात घेत कोकण रेल्वेचा वेग नियंत्रित ठेवण्यात येतो. आता मान्सूनची परतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याने मार्गाची सुरक्षा तपासली गेली आहे. त्यानुसार रेल्वे प्रशासनाने २१ ऑक्टोबरपासून गाड्यांचा वेग वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
गाड्यांचा वेग वाढल्याने मुंबई ते गोवा व केरळकडे जाणार्‍या व येणार्‍या प्रवाशांचा प्रवास अधिक जलद होणार आहे. पावसाळी वेळापत्रकानुसार गाड्यांच्या वेळेत जो विलंब होता तो आता कमी होणार असून गाड्या मूळ वेळेनुसारच धावणार आहेत. यामुळे दीपावली सुट्टीच्या हंगामात गावी येणार्‍या कोकणवासियांना फायदा होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button