
ठाकरे शिवसेनेचे प्रसाद रायंगणकर यांच्या वतीने शिक्षकेतर महिलांचा सत्कार

रत्नागिरी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे रत्नागिरी शहर प्रभाग क्र. ११ चे शाखा प्रमुख प्रसाद यशवंत रायंगणकर यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकेतर महिलांचा सत्कार करण्यात आला.
रत्नागिरी शहर प्रभाग क्र. १ मधील सौ. मनीषा आलीम आणि तसेच प्रभाग क्र ११ मधील सौ. शमिका शशिकांत साळवी या शैक्षणिक क्षेत्रात करत असलेल्या सेवेबद्दल त्यांचा शिवसेना शहर प्रमुख प्रशांत साळुंखे आणि महिला शहर प्रमुख सेजल बोराटे व शाल्मली प्रसाद रायंगणकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपशहर प्रमुख सलील डाफळे, नितीन तळेकर, विभाग प्रमुख शरद राणे, उपविभाग प्रमुख प्रशांत बंदरकर, महिला विभाग प्रमुख सोनाली साळवी उपस्थित होते.




