भाजपचे पश्चिम तालुकाध्यक्ष उदय घाग यांचा तडकाफडकी राजीनामा


रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या येऊ घातलेल्या निवडणुका, आगामी काळात रत्नागिरी जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक अशातच भाजपचे पश्चिम तालुकाध्यक्ष उदय घाग यांनी जिल्हा नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांच्याकडे पाठवला आहे. घाग यांनी दिलेल्या दिलेल्या राजीनामापत्रात गेल्या काही काळापासून पक्ष संघटनेमध्ये काम करत असताना माझ्या पदाची व जबाबदारीची अपेक्षित दखल घेतली जात नसल्याची जाहीर खंत व्यक्त केली आहे. पक्षाच्या संघटनात्मक कामामध्ये प्रामाणिकपणे वेळ देऊन, कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करण्याचा मी सातत्याने प्रयत्न केला. मात्र काही निर्णयप्रक्रिया व संघटनात्मक बाबींमध्ये स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मताना अपेक्षित महत्त्व मिळत नसल्याचे या राजीनामा पत्रात नमूद केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button