पवन तलाव मैदानात भरणार दिवाळी बाजार


चिपळूण शहरातील पवन तलाव मैदानात दिवाळी बाजार भरणार आहे. फटाके, कंदिल खाद्य पदार्थांसह अन्य साहित्य विक्री करणार्‍या व्यावसायिकांना येथे स्टॉल देण्याचा निर्णय नगरपरिषदेने घेतला आहे. त्यामुळे याचा व्यावसायिकांसह ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. लवकरच या मैदानाची साफसफाई केली जाणार आहे.
दरवर्षी दिवाळी सणादरम्यान बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर अतिक्रमण होते याचा फटका नागरीकांसह वाहनचालकांना बसतो. त्यामुळे बाजारपेठेत मोठी वाहतूककोंडी होते. त्यातच मोठा नफा मिळवून देणार्‍या फटाके विक्रीच्या दुकानांची संख्या लक्षणिय असते. विशेष म्हणजे यातील ९५ टक्के दुकाने अनधिकृत असतात. त्यांच्याकडे फटाके विक्रीसाठीचे कोणतेही परवाने नसतात. त्यामुळे दुर्घटना घडण्याची भीतीही अधिक असते. यामुळे संभाव्य घटना टाळण्यासाठी नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्यासह सर्व नगरसेवक व प्रशासनाने दिवाळी साहित्य विक्रीसाठी पवनतलाव मैदान देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
पावसामुळे पवन तलाव मैदानाला गवताने वेढले आहे. त्यामुळे दिवाळी बाजार सुरू
करण्याच्या धर्तीवर लवकरच या मैदानाची साफसफाई केली जाणार आहे त्यानंतर हे स्टॉ ल दिले जाणार आहेत या स्टॉलमधून प्रामुख्याने फटाके, आकाश कंदिल, चांदण्या, पणत्या, रांगोळ्या, मावळे व खाद्यपदार्थांची विक्री केली जाणार आहे एकाच ठिकाणी हे सर्व साहित्य मिळणार असल्याने ग्राहकांना बाजारपेठ फिरण्याची गरज पडणार नसून व्यावसायिकांचाही चांगला व्यवसाय होणार आहे त्यामुळे नगरपरिषदेच्या या निर्णयाला व्यावसायिक किती प्रतिसाद देतात हे लवकरच दिसून येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button