सुषमा अंधारेंचं ‘ते’ वाक्य झोंबलं, रोहित पवार यांनी सुषमा अंधारे यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना त्यांना खडेबोल सुनावले


पुण्यातील एस.एम.जोशी पुलाजवळ तब्बल 12 दिवस चाललेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन रविवारी स्थगित करण्यात आले होते. राज्य सरकार आणि आंदोलनकर्ते दोन्ही बाजूंनी एक-एक पाऊल मागे घेत तोडगा काढला होता.
एमपीएससी आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार (Vivek Bhimanwar) यांचा राजीनामा घ्यावा, ही आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी होती. मात्र, पेपरफुटीची चौकशी होईपर्यंत विवेक भीमनवार सुट्टीवर राहतील, असे सांगून राज्य सरकारने आंदोनलकर्त्यांची बोळवण केली होती. रोहित पवार यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले होते. तब्बल 11 दिवस रोहित पवार (Rohit Pawar) एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसोबत एस.एम.जोशी पुलाजवळ ठाण मांडून होते, रात्रीही ते तिथेच झोपायचे. मात्र, भीमनवारांच्या राजीनाम्याशिवाय रोहित पवार यांनी आंदोलन मागे घेतल्याने ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी नाराजी व्यक्त केली होती. आपण युद्धात जिंकलो आणि तहात हरलो, असे वाटत आहे. अध्यक्षांचा राजीनामा ही मागणी होती. या आंदोलनातून हातात काही पडलं नाही, अशी टिप्पणी सुषमा अंधारे यांनी केली होती. सुषमा अंधारे यांची ही टीका रोहित पवार यांच्या चांगलीच जिव्हारी लागल्याने त्यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन सडेतोड प्रत्युत्तर दिले. रोहित पवार यांनी सुषमा अंधारे यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना त्यांना खडेबोल सुनावले. मला सुषमा ताईंना आणि लोकांनाही काही गोष्टी सांगायच्या आहेत. तुम्ही एमपीएससी आंदोलनात आलात, व्यासपीठावर आक्रमक बोललात आणि निघून गेलात. जर खऱ्या अर्थाने तुम्हाला विद्यार्थ्यांचा कळवळा होता तर तिकडे बसायला पाहिजे होतं ना तुम्ही, झोपायला पाहिजे होते. तुमचे नेते तिकडे येऊन राहायला पाहिजे होते आणि या मागणीला पुढे घेऊन जायला पाहिजे होते. टीव्हीवर बोलताना तुम्ही काही बोलू शकता. तिथे काय परिस्थिती असते केवढं प्रेशर होतं , 15 जणांवर कारवाई झाली होती, पोलिसांनी आम्हाला सांगितलं होतं, 800 लोकांची नाव आमच्याकडे आहेत, दुसऱ्या दिवशी कारवाई होणार होती, त्यानंतर आणखी 1200 विद्यार्थ्यांवर कारवाई झाली असती कदाचित , ही कारवाई झाली असती तर आम्ही तिथे मात्र पोलिसांच्या गाडीत असतो, फोटो काढले असते, राजकीय फायदा झाला असता आम्हाला, आम्ही राजकीय पोळी भाजू शकलो असतो. अरे पण त्या विद्यार्थ्यांचं नुकसान झालं असतं त्याचं काय? त्यांच्या भवितव्याचं नुकसान करुन आम्ही आमच्या राजकीय पोळी भाजल्या असत्या, हिरो बनलो असतो मार खाऊन, हे आम्हाला पटत नाही. त्यामुळे कुठे ना कुठे आपल्याला विद्यार्थ्यांची भूमिका मांडत असताना काही गोष्टींचा विचार करावा लागतो. यापूर्वीही आंदोलन झाली आहेत. मात्र, मुख्य सचिवाची सही असलेली मागण्या मान्य झाल्याचं पत्र मिळवणे सोपे नसते, असे रोहित पवार यांनी म्हटले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button