बाजारपेठेत फटाके विक्रीला बंदी; चिपळूण नगरपरिषदेचा निर्णय


दिवाळीच्या पार्श्वभूमीवर चिपळूण शहरातील सुरक्षिततेच्या दृष्टीने चिपळूण नगरपरिषदेने महत्वपूर्ण निर्णध घेतला आहे. बाजारपेठेतील फटाके विक्रीला आळा घालून सर्व जटाके विक्रेत्यांना एकाच ठिकाणी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णड नगराध्यक्ष उमेश यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. मात्र, फटाके ज्या व्यावसायिकांकडे परवाने असतील त्यांना गाळ्यात फटाके विक्रीस परवानगी देण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले.
दिवाळीच्या काळात बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यातच फटाक्यांचे स्टॉल बाजारपेठेत उभारले जान असल्याने सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो, यापूर्वी बाजारपेठेत आगीच्या घटना घडल्याने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. फटाके विक्रेत्यांसाठी लवकरच स्वतंत्र जागा निश्चित करण्यात येणार असून, नगराध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली गटनेत्यांकडून संबंधित जागेची पाहाणी केली जाणार आहे. या ठिकाणी सर्व फटाके विक्रेत्यांना स्टॉलसाठी जागा उपलब्ध करून दिली जाईल. त्यामुळे नागरिकांना एकाच उनी फटाके खरेदी करता येतील आणि बाजारा ठेची सुरक्षितताही राखता येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button