राजापूरच्या नाणारमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना; खाडीत एकाच कुटुंबातील चार जण बुडाले!


शिंपले गोळा करण्यासाठी गेले असताना दुर्घटना; परिसरात शोककळा, बचावकार्य सुरू


राजापूर तालुक्यातील नाणार इंगळवाडी येथे खाडीत एकाच कुटुंबातील चार जण बुडाल्याची घटना घडली आहे शिंपले गोळा करण्यासाठी खाडीत उतरलेल्या या चौघांना पाण्याचा अंदाज न आल्याने दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे नाणार परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नाणार इंगळवाडी येथील एकाच कुटुंबातील चार जण शिंपले पकडण्यासाठी खाडी परिसरात गेले होते. शिंपले गोळा करण्यासाठी पाण्यात उतरले असताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडाल्याचे सांगण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासनाकडून तातडीने शोधमोहीम सुरू करण्यात आली. या दुर्घटनेत नेमकी काय परिस्थिती आहे, याबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.

एकाच कुटुंबातील चार जणांवर ओढवलेल्या या संकटामुळे नाणार परिसरात शोककळा पसरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button