थिबा राजा कालीन बुद्ध विहाराची जागा ही बौद्ध समाजाच्या ताब्यात मिळवून देणारच – अँड. संदिप बर्वे.

        दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा जिल्हा तालुका शाखा रत्नागिरी यांचे विध्यमाने आणि थिबा राजा कालीन बुद्ध विहार बचाव संघर्ष समिती रत्नागिरी यांचे सहकार्याने शनिवार दिनांक १० ऑक्टोबर २०२६ रोजी, सकाळी ११.३० वाजता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन ( सिव्हिल हॉस्पिटल शेजारी ) येथे " थिबा राजा कालीन बुद्ध विहार जागेच्या न्यायालयीन कामकाजाबाबत " मार्गदर्शनपर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमांची प्रारंभी प्रमुख अतिथी आणि मार्गदर्शक, दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चे रिपोर्टींग ट्रस्टी मा. अँड. संदीपजी बर्वे साहेब यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करून  त्रिशरण पंचशील पठण झाले. सभागृहामध्ये तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दिप प्रज्वलन करून चर्चासात्राला सुरुवात झाली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री. एल. व्ही. पवार ( दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, जिल्हाध्यक्ष तथा थिबा राजा कालीन बुद्धविहार बचाव संघर्ष समिती रत्नागिरी ) यांनी भूषविले. या चर्चा सत्रामध्ये  थिबा राजाकालीन बुद्ध विहार बचाव संघर्ष समिती अध्यक्ष श्री. एल. व्ही. पवार साहेब, थिबा राजा कालीन बुद्धविहार बचाव संघर्ष समिती कार्याध्यक्ष श्री. अनंत विठ्ठल सावंत साहेब, थिबा राजा कालीन बुद्ध विहार बचाव संघर्ष समिती उपाध्यक्ष श्री. प्रकाश यशवंत पवार, थिबा राजा कालीन बुद्धविहार बचाव संघर्ष समिती सचिव श्री. अमोल श्रीधर जाधव, थिबा राजा कालीन बुद्ध विहार बचाव संघर्ष समिती प्रमुख मार्गदर्शक श्री. रत्नदीप कांबळे साहेब आणि श्री. दिवेन कांबळे साहेब आणि युवा नेतृत्व श्री. सौरभ आयरे साहेब यांनी आपली मते मा. अँड. संदिप बर्वे साहेबांसमोर मांडली. 

आपल्या मार्गदर्शनपर भाषणात ॲड. संदीप बर्वे यांनी, सर्वप्रथम रत्नागिरी मधील बौद्ध बांधवांची जी थिबा राजा कालीन बुद्ध विहाराची जमिनीची मागणी आहे त्या मागणीला दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चा रिपोर्टींग ट्रस्टी म्हणून माझा आणि बर्वे अँड कंपनी यांच्या पूर्ण पाठींबा आहे. यावेळी रत्नागिरी कोर्टात कम्युनिटी सेंटर चे बांधकाम करण्यास जो स्थगिती आदेश आणलेला आहे त्या आदेशाचा आणि त्या संपूर्ण दाव्याचा अभ्यास करता या दाव्याला अधिक बळकटी मिळावी या करिता अजून कोणते मुद्दे मांडणे आवश्यक आहे या बाबींचा उवापोह केला. थिबा राजा कालीन बुद्ध विहाराची जागा ही बौद्ध समाजास देण्याचे निर्देश तत्कालीन उत्पादन शुल्क मंत्री यांनी दिले असताना, त्या जागेची मोजणी होऊन रेखाकन होऊन, ती जागा बुद्ध विहारासाठी राखीव असलेली आहे. त्यामुळे त्या जागेवर फक्त आणि फक्त बौद्ध समाजाचा हक्क आहे. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे समज मंदिर ( कम्युनिटी सेंटर ) होणार नाही याकरिता जो थिबा राजाकालीन बुद्धविहार बचाव संघर्ष समितीचा लढा सुरु आहे तो आपल्याला निरंतर सुरु ठेवायचा आहे आणि त्या लढ्यामध्ये आपला विजय हा निश्चित आहे असे विश्वासदर्शक उदगार मा. बर्वे साहेबांनी व्यक्त केले. थिबा राजा कालीन बुद्ध विहाराची न्यायालयीन लढाई लढत असताना आपल्या समाजाच्या बाजूने कोणकोणते मुद्दे आहेत, त्यांची कायदेशीर लढाई कशी लढावी यांचे मार्गदर्शन मा. बर्वे साहेबांनी केले. ज्या ज्या वेळी मला तुम्ही हाक द्याल त्या त्या वेळी मी तुमच्या सोबत कायदेशीर लढाई सोबतच रस्त्यावरची लढाई लढण्याकरिता रत्नागिरी मध्ये येईल असे आश्वासन उपस्थित बंधुभगिनींना मा. बर्वे साहेबांनी दिले.
ॲड. बर्वे यांनी चर्चासत्रामध्ये उपस्थितांना विश्वास दिल्याने उपस्थित्तांत समाधानाचे वातावरण होते. हे चर्चासत्र यशस्वी करण्याकरिता दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चे प्रदेश सचिव श्री. दिपक सि. जाधव, जिल्हाध्यक्ष श्री. एक. व्ही. पवार, कार्याध्यक्ष श्री. शिवराम विठ्ठल कदम, जिल्हा सचिव बी. के. कांबळे, तालुका अध्यक्ष मुकुंद कांबळे, तालुका उपाध्यक्ष प्रदिपदादा पवार, महिला जिल्हा अध्यक्षा सौ. स्मिता कांबळे, तालुकाध्यक्षा सौ अस्मिताताई कांबळे,आणि संपूर्ण जिल्हा आणि तालुका कार्यकारिणी यांनी परिश्रम घेऊन नियोजन केले. थिबा राजा कालीन संघर्ष समिती रत्नागिरीचे कार्याध्यक्ष अनंत सावंत गुरुजी, उपाध्यक्ष प्रकाश य. पवार, किशोर पवार, सचिव अमोल जाधव, सहसचिव रूपेश कांबळे श्री. दिवेन कांबळे, श्री. रत्नदीप कांबळे, श्री. सुनिल आंबूलकर, श्री. केतन पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button