रत्नागिरी करांनो पाणी जपून वापरा, रत्नागिरी शहरात दर सोमवारी पाणीपुरवठा बंद


रत्नागिरी : अल निनोच्या प्रभावामुळे यंदा कमी प्रमाणात झालेला पाऊस तसेच वाढत असलेले तापमान ह्यामुळे भविष्यात पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता मोठया प्रमाणावर जाणवू शकते. त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पाण्याच्या बचतीकरिता १२ ऑक्टोबरपासून पुढील दर सोमवारी पुढील मान्सूनच्या नियमित आगमनापर्यंत शहरातील संपूर्ण पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
शासनाच्या निर्देशानुसार १० टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे, याची सर्व नागरिकांनी नोंद घेऊन उपलब्ध पाण्याचा योग्य व काटकसरीने वापर करून नगर परिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन रत्नागगिरी नगरपालिकेने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button