सुवर्णकार धनंजय केतकर अपहरण प्रकरणातील चार फरार आरोपी जेरबंद


देवरुख पोलिसांची कारवाई; एर्टिगा कार जप्त, आरोपींची संख्या १३


देवरुखनजीक साडवली-सह्याद्रीनगर येथील सुवर्णकार धनंजय केतकर यांच्या अपहरण व लूट प्रकरणातील वर्षभरापासून फरार असलेल्या चार आरोपींना देवरुख पोलिसांनी अटक केली. महेश मोरे (३३) व तेजस तांडेल (३१) यांना कल्याण, दशरथ साळुंखे (३९) याला बदलापूर, तर सचिन खुडे (४३) याला बारामती येथून ताब्यात घेण्यात आले. गुन्ह्यात वापरण्यात आलेली एर्टिगा कारही सचिन खुडे याच्याकडून जप्त करण्यात आली आहे.

१७ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री देवरुख-साखरपा मार्गावरील वांझोळे परिसरात धनंजय केतकर यांचे अपहरण करून त्यांच्याकडील सुमारे १४ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि २० हजार रुपये रोख रक्कम लुटण्यात आली होती. त्यानंतर त्यांना वाटूळ येथे सोडण्यात आले होते.

या प्रकरणाचा तपास देवरुख पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सुरू केला. मोबाईल सीडीआर, एसडीआर आणि बँक स्टेटमेंटच्या तांत्रिक विश्लेषणातून फरार आरोपींचा ठावठिकाणा मिळाला. यापूर्वी या प्रकरणात नऊ आरोपींना अटक करण्यात आली होती. नव्या चार अटकांनंतर आरोपींची संख्या १३ झाली आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या आदेशानुसार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम आणि पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथकांनी ही कारवाई केली. या प्रकरणात यापूर्वी रिव्हॉल्वरही जप्त करण्यात आला आहे. चारही आरोपींना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button