रत्नागिरी शहरातील झारणीरोड येथे विसर्जन मिरवणुकीत बाटली फेकल्या प्रकरणी संशयित ताब्यात


रत्नागिरी शहरातील झारणीरोड येथे घरगुती मिरवणुकीदरम्यान बाटली फेकल्याची तक्रार शहर पोलिसांत करण्यात आली आहे. ही घटना २५ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी सागर चक्रधर दळी (४५, रा.रत्नागिरी) यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयित तरुणाला ताब्यात घेतले आहे.
अनंत चतुदर्शीच्या निमित्ताने गणपती विसर्जन करण्यात येत होते. शहरातील झारणीरोड येथे अशाच प्रकारे एक घरगुती गणपती विजर्सन मिरवणुक वाजत-गाजत जात होती. यावेळी एक बाटली मिरवणुकी जाणार्‍या दिशेने आली. दरम्यान या प्रकाराने एकच खळबळ उडाली याठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण हाणार अशी शक्यता तयार झाली. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तसेच संबंधित तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button