
जि.प. सह चार पं. स. वर सौरसंच,लाखो रुपयांची बचत
रत्नागिरी जि.प.च्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत उर्जा विकास कार्यक्रमातून जि.प. व पं.स. कार्यालयाच्या इमारतींवर रूफ टॉप नेट मिटरींग सौर विद्युत संच बसविण्यात येणार आहे. त्यामुळे रत्नागिरी जि.प.च्या इमारतीसह मंडणगड, गुहागर, चिपळूण व संगमेश्वर पं. स. कार्यालयांच्या वीज बिलांचा त्रास आता कमी होणार आहे. यासाठी एकूण १८ लाख ८३ हजाराच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या यंत्रणेमुळे वीज बिलाच्या सुमारे ३० लाख २४ हजार रुपयांची बचत होणार आहे.
www.konkantoday.com