
आश्वासने व बैठका होऊनही बागायतदारांना व्याजमाफीची प्रतिक्षा
अवकाळी पावसामुळे २०१४-१५ मध्ये आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यावेळी पीक कर्जावरील तीन महिन्यांच्या व्याजाची रक्कम शासन देणार असल्याचे जाहीर केले होते. बँकांकडून शेतकर्यांना पुनर्गठनाचा लाभ मिळाला. परंतु व्याजाच्या रकमेत अद्याप एकही हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे बँका कर्जदारांना व्याजाची रक्कम ताबडतोब भरण्याची सक्ती करत आहे.
व्याजमाफीबाबत चर्चा करण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेचे अधिकारी, सहकार खात्याचे अधिकारी, तसेच मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी, आंबा बागायतदार यांची संयुक्त बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली होती, मात्र बैठकीचे फलित काहीच झाले नसल्याने शेतकरी अद्याप वंचित आहेत.
www.konkantoday.com