
राज्य फेडरेशन च्या पोटनियमात सुधारणा, ठेव संरक्षणासाठी शासनाने भरीव योगदान देण्याची मागणी, आणि प्रत्येक महिन्यात संस्थेने नवीन १० युवकांना संस्थेबरोबर सलग्न करण्याचे आवाहन करत फेडरेशन ची वार्षिक सभा रत्नागिरीत संपन्न.

रत्नागिरीत आयोजित केलेली राज्य पत संस्था फेडरेशन ची सभा Adv. दीपक पटवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाली. सभेला महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यातील विविध संस्था प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
फेडरेशन च्या पोट नियमात अनेक बदल सभेने मंजूर केले. फेडरेशन च वर्गीकरण “अन्य संस्था “प्रकारात करण्यासाठी सभेने मंजुरी दिली.


संस्थांच्या ठेवींना संरक्षण मिळावे यासाठी शासनाचे भरीव योगदान मिळावे. योग्य यंत्रणा प्रभावीपद्धतीने कार्यान्वित करावी तो पर्यंत अंशदान भरण्याची सक्ती संस्थांवर करू नये अश्या आशयाचा ठराव पारीत करण्यात आला.
पत संस्थाना क्रेडिट इन्स्टिट्यूशन म्हणून मान्यता देण्यासाठी केंद्रीय कायद्यातील तरतुदी चा वापर RBI ने करावा.
पत संस्था चे वाढते व्यवहार लक्षात घेऊन पत संस्थान ची श्रेणी ठरवून वर्गवारी करावी. व पत संस्थानच्या वाढीसाठी पुरक धोरण ठरवण्यात यावे
यासाठी प्रयत्न करण्याचा ठराव पारित करण्यात आला.
पत संस्थांसाठी प्रशिक्षणाचे महत्व लक्षात घेऊन प्रशिक्षणासाठी सर्वंकष अभ्यासक्रम तयार करण्याची तसेच संस्थांच्या व्यवहारांचे डॉक्यूमेंटेशन कायद्याच्या चौकटीत आणण्यासाठी अर्ज , करार, रोखे, इत्यादी कागदपत्राचे आदर्श नमुने पुस्तिका दोन महिन्यात प्रकाशित करण्यात येईल अशी घोषणा फेडरेशन चे अध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी केली. संस्थानी आपली प्रतिमा अधिक विश्वासार्ह, शिस्तप्रिय, करण्यासाठी सजग राहावे ,युवा वर्गाला संस्थांशी सलग्न करण्यासाठी उपक्रम राबवावेत प्रत्येक महिन्यात किमान १० नवीन युवक संस्थे बरोबर जोडण्याचा कार्यक्रम सर्व संस्थानी अग्रक्रमाने राबवावा असे आवाहन अध्यक्षीय समारोपात दीपक पटवर्धन यांनी केले.
वार्षिक सभा आणि अभ्यासवर्गाचा हा कार्यक्रम १ आणि २ सप्टेंबर रोजी रत्नागिरीत अत्यंत उत्साहात आणि संस्था प्रतिनिधींच्या मोठ्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमासाठी फेडरेशन महासचिव राजोबा सर, उपाध्यक्ष डॉ शिंगी, माजी अध्यक्ष काकासाहेब कोयटे, डॉ. भोसले , श्री. छाबडा, प्रा. श्री आकरे, श्री. वाजे, श्री. तांबेकर, श्री. बांगर. मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. लवांदे. यासह विभागीय फेडरेशन चे संतोष थेराडे, सिंधुदुर्ग पत संस्थेचे अध्यक्ष श्री राऊळ ,डीसीसी बँकेचे संचालक श्री सचिन भिंगारडे, शिवकृपा पत संस्थेचे अध्यक्ष गोरखनाथ चव्हाण, छत्रपती संभाजी महाराज पत संस्थेचे अध्यक्ष लेंभे, राजापूर कुणबी संस्थेचे अध्यक्ष मांडवकर, नागपूर पत संस्था जिल्हा फेडरेशन अध्यक्ष राजेंद्र घाटे. यांचे सह अनेक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हा उपनिबंधक रत्नागिरी श्री राम कुलकर्णी यांनी अभ्यासवर्गाचे उद्घाटन केले. अभय माटे माजी अध्यक्ष जनता सहकारी बँक , डॉ. सोपान शिंदे , श्री. सुहास पाटणकर, यांनी अभ्यासवर्गाला मार्गदर्शन केले. DPDP कायदा ,डेटा संरक्षण या बाबत प्रथमच मार्गदर्शनपर व्याख्यान श्री अभय माटे यांनी दिले.
अनेक प्रायोजकानी आपापली सॉफ्टवेअर आपली ऍप, विमा योजना याबाबत प्रतिनिधीना माहिती दिली. या आयोजना साठी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे भरीव सहकार्य लाभले. कोकणात. रत्नागिरी मध्ये ऐन श्रावण मासात सहकाराचा महामेळ अतिशय उत्साहात आणि आणि उत्तम नियोजनात पार पाडला. रत्नागिरीतील सहकाराचे हे व्यापक आयोजन लक्षणीय ठरले.




