
रत्नागिरी तालुक्यातील राई खापरेवाडी येथे वृद्धाची आत्महत्या
रत्नागिरी तालुक्यातील राई खापरेवाडी येथे गळफास घेऊन वृद्धाने आत्महत्या केली ही घटना शनिवारी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास घडली वासुदेव भागा खापरे (६७, रा. राई खापरेवाडी रत्नागिरी) असे मृताचे नाव आहे. वासुदेव यांनी आजारपणाला कंटाळून राहत्या परी घराच्या वाशाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. अशी नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत करण्यात आली आहे.




