
रत्नागिरी जिल्हा परिषद कामवाटप समितीची सभा ३ सप्टेंबर रोजी
रत्नागिरी, दि. ३१ ) : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या सुशिक्षित बेरोजगार अभियंता व मजूर सहकारी संस्थांसाठीच्या कामवाटप समितीची सभा गुरुवार, दि. ३ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजता आयोजित करण्यात आली आहे. ही सभा जिल्हा परिषदेच्या कै. शामराव पेजे सभागृहात पार पडणार आहे. या बैठकीमध्ये मजूर सहकारी संस्था, सुशिक्षित बेरोजगार अभियंता (स्थापत्य) तसेच सुशिक्षित बेरोजगार अभियंता (विद्युत) यांच्यासाठी रु. १० लाखांच्या मर्यादेतील कामांचे वाटप करण्यात येणार आहे. संबंधित संस्था व अभियंत्यांनी या सभेस वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन कामवाटप समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.




