जिल्ह्यातील ११ मुख्य शासकीय रुग्णालयांपैकी ५ रुग्णालयांचे फायर ऑडिट पूर्ण


अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात दि. २४ ऑगस्टला व्हेंटिलेटरच्या स्फोटामुळे तीन नवजात चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. जिल्ह्यातील ११ मुख्य शासकीय रुग्णालयांपैकी ५ रुग्णालयांचे फायर ऑडिट पूर्ण झाले आहे. उर्वरित रुग्णालयांच्या ऑडिटसाठी जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी दिली.
जिल्हा रुग्णालयाचे इलेक्ट्रीक ऑडिट देखिल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इलेक्ट्रीक डिपार्टमेंकडून करून घेतले आहे. सर्व तपासणीनंतर त्यांनी यत्रणा सुरक्षित असल्याचे अहवाल देखिल दिल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अखत्यारित दापोली, कळंबणी (खेड) आणि कामथे (चिपळूण) ही ३ उपजिल्हा रुग्णालये, तसेच मंडणगड, गुहागर, देवरुख, संगमेश्वर, पाली, लांजा, राजापूर आणि
रायपाटण ही ८ ग्रामीण रुग्णालये येतात. कोरोना काळापासून या सर्व रुग्णालयांमध्ये मोठ्याप्रमाणावर ऑक्सिजन सिलिंडरचा साठा उपलब्ध आहे. आजही रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सिजनचा नियमित वापर केला जातो. त्यामुळे आगीसारखी कोणतीही अप्रिय घटना घडू नये, यासाठी रुग्णालय प्रशासनाला सातत्याने खबरदारी घ्यावी लागत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button