शोभिवंत मत्स्यपालनातून रोजगाराच्या नव्या संधी

रत्नागिरीतील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात दोन दिवसीय प्रशिक्षण; आधुनिक तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन

रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत झाडगाव येथील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात ‘शोभिवंत मत्स्यपालन व व्यवस्थापन’ या विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. दिलासा जनविकास प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या प्रशिक्षणात होतकरू शेतकरी, मत्स्य उद्योजक व विद्यार्थ्यांना शोभिवंत मत्स्यपालन, मत्स्यालय व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यवसायाच्या संधींबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

प्रशिक्षणात शोभिवंत माशांची ओळख, प्रजनन व पालन, पाणी व्यवस्थापन, मत्स्यालय निर्मिती, खाद्य व्यवस्थापन, रोग नियंत्रण, सागरी शोभिवंत मासे, माशांची वाहतूक तसेच प्रकल्पाचे अर्थशास्त्र याबाबत तज्ज्ञांनी माहिती दिली.

समारोप कार्यक्रमास वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. केतनकुमार चौधरी, जिल्हा समन्वय सहयोगी रोहित सावंत आणि दिलासा जनविकास प्रतिष्ठानचे सुरज गगनग्रास उपस्थित होते. प्रशिक्षणामुळे रोजगार, स्वयंरोजगार आणि व्यवसायाच्या विविध संधींबाबत व्यावहारिक ज्ञान मिळाल्याचे प्रशिक्षणार्थींनी सांगितले.

कार्यक्रमासाठी कांचन पवार (आयएफएस), महादेव शिंगाडे, विक्रम यादव तसेच दिलासा जनविकास प्रतिष्ठान यांचे सहकार्य लाभले. डॉ. आसिफ पागरकर, डॉ. मनोज घुघुसकर, डॉ. हरिष धमगाये, प्रा. नरेंद्र चोगले, प्रा. सचिन साटम, वर्षा सदावर्ते आणि डॉ. अपूर्वा सावंत यांनी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.
………………………..
दिव्य रत्नागिरी | News
🔗 वेबसाईट :
https://divyaratnagiri.com
📘 फेसबुक पेज :
https://www.facebook.com/दिव्य-रत्नागिरी-111446977265509
📺 यूट्यूब न्यूज चॅनेल :
https://www.youtube.com/channel/UCopNEJ-BiwPe79ryMo3Ckfg
🪀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला आजच जॉइन व्हा
https://chat.whatsapp.com/D6i6Q7Vh1Vp2YG35OooOx5?mode=gi_t

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button