धापसेवाडीत ४० वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

खेड : तालुक्यातील घाणेखुंट येथील धापसेवाडी येथे ४० वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी उघडकीस आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील बारकु धापसे (वय ४०, रा. धापसेवाडी, घाणेखुंट, ता. खेड, जि. रत्नागिरी) यांनी त्यांच्या नवीन बांधण्यात आलेल्या घराच्या लोखंडी आळ्याला निळ्या रंगाच्या नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला.
ही घटना २६ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेची नोंद त्याच दिवशी सकाळी ११.१५ वाजता करण्यात आली. मृतदेह उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी येथे नेण्यात आला.
या प्रकरणी आमृ. क्र. ७०/२०२६, बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये नोंद करण्यात आली असून, पुढील तपास खेड पोलिसांकडून सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button