
चिपळूण टपाल विभागात ग्रामीण डाक सेवकांच्या ८१ जागांसाठी भरती; २१ सप्टेंबरपर्यंत मुदत
रत्नागिरी, दि 28 ) – चिपळूण टपाल विभागांतर्गत विविध प्रवर्गातील ‘ग्रामीण डाक सेवक’ (GDS) पदांच्या तब्बल ८१ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असल्याची माहिती चिपळूण विभागाच्या डाकघर अधीक्षकांनी दिली आहे.
भरतीचे महत्त्वाचे तपशील:
- पदाचे नाव: ग्रामीण डाक सेवक (GDS)
- एकूण रिक्त पदे: ८१
- अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: ३१ ऑगस्ट
- अर्ज करण्याची अंतिम मुदत: २१ सप्टेंबर (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)
- अधिकृत संकेतस्थळ: https://indiapost.gov.in/gdsonlineengagement
इच्छुक उमेदवारांनी विहित मुदतीत अधिकृत पोर्टलला भेट देऊन ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन टपाल विभागामार्फत करण्यात आले आहे.




