आदित्य ठाकरे उद्या लोटे औद्योगिक वसाहतीची पाहणी करणार


उद्योजकांशी संवाद साधून जाणून घेणार अडचणी


चिपळूण : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवा सेना प्रमुख तथा आमदार आदित्य ठाकरे बुधवार, दि. २६ ऑगस्ट रोजी रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते सायंकाळी ४.३० वाजता लोटे औद्योगिक वसाहतीची पाहणी करणार आहेत.

लोटे येथील उद्योग भवन येथे आदित्य ठाकरे उद्योजकांशी संवाद साधणार असून, त्यांच्या अडचणी, प्रलंबित प्रश्न तसेच विविध मागण्यांची माहिती जाणून घेणार आहेत. या संवादानंतर उद्योग भवन येथे आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.

आदित्य ठाकरे यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक औद्योगिक क्षेत्रातील प्रश्न आणि उद्योजकांच्या अडचणींवर चर्चा होण्याची शक्यता आहे. पत्रकार बांधवांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button