
पवित्र पोर्टलच्या जाहिरातीवर शिक्षक समितीचा आक्षेप, ६८७ पदे भरण्याची मागणी
रत्नागिरी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने ’पवित्र पोर्टल’द्वारे गणित व विज्ञान विषयाच्या ४७० पदवीधर शिक्षकांच्या भरतीसाठी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीवर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने आक्षेप पतला आहे. जाहिरातीत तातडीने बदल करून कार्यरत पदवीधर शिक्षकांचे फेरसमायोजन करावे आणि जिल्ह्यातील सर्व मंजूर पदांवर सेवाज्येष्ठ शिक्षकांना संधी द्यावी, अशी मागणी समितीने केली आहे.
जिल्ह्यातील रिक्त पदांचा विचार करता ४७० पदांऐवजी एकूण ६८७ उपशिक्षक पदे भरण्यासाठी उपलब्ध असल्याचा दावा शिक्षक समितीने केला आहे. जाहिरातीत असलेल्या ४७० पदांव्यतिरिक्त आणखी २१७ पदे उपलब्ध असून, या सर्व पदांचा समावेश भरती प्रक्रियेत करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.




