
दापोली तालुक्यातील मुर्डी येथे जखमी गरुडाची वनविभागाकडून सुटका
दापोली तालुक्यातील मुर्डी गावात जखमी अवस्थेत आढळलेल्या समुद्री गरुडाची वन विभागाच्या कर्मचार्यांनी सुटका करून त्याला उपचारासाठी पुढे पाठविण्यात आले.
मुर्डी गावातील ग्रामस्थ श्री. विनय जोशी यांना जखमी समुद्री गरुड आढळून आला. वन विभागाचे कोंगळे बीटचे वनरक्षक प्रभू साब ताडील बीटच्या वनरक्षक शुभांगी गुरव तसेच प्राणीमित्र प्रफुल जोशी यांनी पक्ष्याला ताब्यात घेतले. कांदळवन विभागाचे परिक्षेत्र वन अधिकारी श्री. निकाळजे यांना घटनेची माहिती देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जखमी समुद्री गरुडाला पुढील उपचारासाठी डहाणू येथे पाठविण्यात आले आहे.




