देवरुख परिसरातील करंबेळे येथील तरुण व्यावसायिक प्रदीप पवार याची आत्महत्या; संगमेश्वर परिसरात हळहळ


देवरुख परिसरातील करंबेळे गावातील अत्यंत मनमिळाऊ आणि कष्टाळू तरुण व्यावसायिक प्रदीप प्रकाश पवार (वय २७) याने टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. स्वतःच्या सर्व्हिसिंग रॅम्पच्या शेडमध्ये गळफास लावून त्याने जीवनयात्रा संपविल्याचे करंबेळे व आसपासच्या परिसरात मोठी खळबळ उडाली असून, ग्रामस्थ आणि मित्रपरिवारातून तीव्र दुःखाची लाट पसरली आहे.
संगमेश्वर तालुक्यातील करंबेळे-शिवणे सीमेवर प्रदीप पवार सर्व्हिसिंग रॅम्प चालवित होता. शुक्रवारी, ७ ऑगस्ट २०२६ रोजी नेहमीप्रमाणे तो सकाळी कामावर गेला होता. रात्री ८ वाजेपर्यंत घरी न परतल्याने आणि फोनही न उचलल्याने त्याचा भाऊ प्रशांत पवार याने रात्री ८:३० वाजला सर्व्हिसिंग रॅम्प येथे जाऊन पाहाणी केली. तेथे शटर बंद होते आणि बाहेर मोटरसायकल उभी होती. शटर उघडून आत पाहिले असता, प्रदीपने छताच्या लोखंडी पाईपला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतल्याचे दुर्दैवी दृश्य दिसून आले. त्याला तातडीने खाली उतरवण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button