
श्री राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्था, रत्नागिरी आयोजित, रत्नागिरी जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा २०२६-२७
श्री राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्था, रत्नागिरी यांच्या वतीने दि. २१ ऑगस्ट ते २३ ऑगस्ट, २०२६ या कालावधीत श्री राधाकृष्ण मंदिर हॉल, राधाकृष्ण नाका, रत्नागिरी येथे रत्नागिरी जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. सदर स्पर्धेचा उद्घाटन समारंभशुक्रवार दि. २१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता होणार आहे. सदर स्पर्धा १. पुरुष एकेरी, २. पुरुष दुहेरी, ३. महिला एकेरी, ४. वयस्कर गट पुरुष, ५. कुमार गट, ६. कुमारी गट, ७. किशोर गट व ८. किशोरी गट अशा आठ गटात खेळवली जाणार आहे. सन २०२६-२०२७ या वर्षातील ही दुसरी स्पर्धा आहे. नवीन खेळाडूंनी २०२६ २७ या वर्षाची रजिस्टेशन फी रु. ५०/- जिल्हा असोसिएशनकडे जमा करावी. स्पर्धेसाठी प्रवेश फी पुरुष व महिला गटासाठी रु. १५०/- दुहेरीसाठी रु. २००/- व लहान गटासाठी रु. १००/-, वयस्कर गटासाठी रु. १५०/- याप्रमाणे निश्चित करण्यात आली आहे. वयस्कर गटातील खेळाडूंना पुरुष एकेरीमध्ये सहभाग घेता येईल. प्रत्येक गटात किमान ८ स्पर्धकांच्या प्रवेशिका असणे आवशक आहे अन्यथा त्या गटातील स्पर्धा रद्द करणात येईल. सर्व स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका सोमवार, दि. १७ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंतच आपल्या तालुका प्रतिनिधीकडे स्पर्धा शुल्कासहित द्यावा. स्पर्धा शुल्काशिवाय कोणत्याही प्रवेशिका स्विकारल्या जाणार नाहीत. विहीत वेळेत न आलेल्या प्रवेशिका स्विकारल्या जाणार नाहीत याची नोंद घ्यावी. याबाबत कोणतीही तक्रार ग्राह्य धरली जाणार नाही. स्पर्धेत सामना खेळणासाठी खेळाडूने पांढरा रंगाचा टी शर्ट किंवा पांढरा शर्ट परिधान करणे आवश्यक आहे. ज्या गटात ८ स्पर्धक नसतील त्या गटाची स्पर्धा रद्द करण्यात येईल. मागावून कोणतीही तक्रार ऐकून घेतली जाणार नाही. या स्पर्धेपासून पुरुष दुहेरी गटाचे सामने उप उपांत्य पर्यंत चार बोर्डाचे तीन सेट असतील व उपांत्य फेरी व अंतिम फेरीतील हे सामने ८ बोर्डाचे ३ सेट अशा पद्धतीनेच खेळवण्यात येणार आहेत, याची सर्व स्पर्धकांनी नोंद घावी. शुक्रवार दि. २१ ऑगस्ट रोजी फक्त वयस्कर गटाने स्पर्धेची सुरुवात होईल. पुरुष एकेरी व दुहेरी गटाचे सामने शनिवार सकाळी 10.00 वा सुरु होतील. रविवारी सकाळी 10.00 वाजता, महिला गट, कुमार आणि किशोर गटाचे सामने सुरु होतील. सदर स्पर्धेमध्ये पुरुष एकेरी व दुहेरी यांना उप उपांत्य फेरीपर्यंत रोख बक्षीसे ठेवण्यात आलेली आहेत. तालुका प्रतिनिधी खालीलप्रमाणे
१. गुहागर श्री. प्रदीप परचुरे (९४२३०४८२५०), २. रत्नागिरी श्री. विनायक जोशी (८३९०३८७४८३), ३. देवरूख श्री. राहुल भस्मे (९६५७६३७६७८), श्री. मोहन हजारे (९४२२०५३९४३), ४. चिपळूण श्री. प्रकाश कानिटकर ९४०३५६४७८२), श्री. दीपक वाटेकर (९९७५५४६६२५), ५. संगमेश्वर श्री. मनमोहन बेंडके (९१३०३०६५२५), ६. लांजा श्री. मनोज जाधव (७६२०११६७३६), ७. खेड श्री. योगेश आपटे (९९५३२२२६३१), ८. राजापूर श्री. मनोज सप्रे (९४०३७६८३७६ ) ९. दापोली- श्री. माधव शेट्ये (९२०९७०९७९२
सदर दर स्पर्धेसाठी प्रमुख पंच म्हणून राष्ट्रीय पंच श्री. विवेक देसाई, राज्यस्तरीय पंच श्री. सागर कुलकर्णी, श्री. विनय गांगण, तसेच स्पर्धा प्रमुख म्हणून राष्ट्रीय पंच श्री. सचिन बंदरकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घेणाचे आवाहन श्री. राजेंद्र शामकांत मलुष्टे (अध्यक्ष, श्री राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्था, रत्नागिरी), श्री. विरेंद्र विष्णू वणजू (उपाध्यक्ष, श्री राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्था, रत्नागिरी), श्री. मकरंद सदाशिव खातू (सेक्रेटरी, श्री राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्था, रत्नागिरी), श्री. निलेश चंद्रकांत मलुष्टे व श्री. योगेश भास्कर मलुष्टे (सह सेक्रेटरी, श्री राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्था, रत्नागिरी) व कार्यकारणी मंडळ, श्री राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्था, रत्नागिरी, श्री. सुचय अण्णा रेडीज (ज्येष्ठ सल्लागार, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन), (श्री. प्रदीप भाटकर (अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन), श्री. सुरेंद्र देसाई (उपाध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन) श्री. मिलींद साप्ते (सचिव, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन), श्री. नितीन लिमये (खजिनदार, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन) यांनी केले आहे.
आपला
मिलींद साप्ते
सेक्रेटरी, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन, रत्नागिरी



