रत्नागिरीत खाकीची मान उंचावली, कर्तबगार पोलीस अधिकारी व अंमलदारांचा शानदार गौरव


गुन्हेगारीचा बिमोड करीत नागरिकांच्या सुरक्षसाठी सदैव तत्पर असणार्‍या आणि कर्तव्य भावनेतून पोलीस दलाची मान उंचाविणार्‍या रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील कर्तबगार पोलीस अधिकारी व अंमलदारांचा नुकताच शानदार गौरव करण्यात आला. रत्नागिरी पोलीस अधिक्षक कार्यालयात आयोजित मासिक गुन्हे आढावा बैठकीमध्ये हा कौतुक सोहोळा पार पडला.
रत्नागिरीचे पोलीस अधिक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधिक्षक बी. बी. महामुनी यांच्याहस्ते या सर्व गुणवंतांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. जिल्ह्यात घडणार्‍या गुन्ह्यांची प्रभावी उकल करणे, नागरिकाभिमुख पोलीसिंग राबविणे आणि विविध विशेष मोहिमा यशस्वीपणे राबविण्यात या पोलीस कर्मचार्‍यांनी मोलाचे योगदान दिले आहे.
या सोहोळ्याचे आणखी एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे रायगड (अलिबाग) येथे झालेल्या २१ च्या कोकण परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळावा २०२६ मध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा दबदबा निर्माण करणार्‍या विजेत्यांचाही यात विशेष सन्मान करण्यात आला. या मेळाव्यात विविध स्पर्धांमध्ये आपल्या कौशल्याची चुणूक दाखवित रत्नागिरीच्या टीमने पदकांची लयलूट केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button