उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत जिल्हा दौऱ्यावर


रत्नागिरी, दि. 25 ) : राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा पुढीलप्रमाणे आहे.
रविवार २६ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता श्री. पतितपावन मंदिर संस्था रत्नागिरी शताब्दी महोत्सवासंदर्भातील कामांबाबत बैठक ( स्थळ: पाली कार्यालय, पाली, ता. जि. रत्नागिरी). सकाळी ११ वाजता मतदारसंघातील एस. टी. महामंडळ विभागाअंतर्गत अडीअडचणींबाबत बैठक (स्थळ: पाली कार्यालय, पाली). दुपारी १२ वाजता रिक्षा व स्कूल बसेसच्या अडीअडचणींबाबत बैठक (स्थळ: पाली कार्यालय, पाली). दुपारी १ वाजता येलोंदेवाडी लघू पाटबंधारे प्रकल्प तालुका चिपळूण धरणाच्या बुडीत क्षेत्राबाहेरील शिरवली व देवखेरकी येथील बांधकामाच्या संपादनाबाबत पूर्ण जिल्हा बैठक (स्थळ: पाली कार्यालय, पाली). दुपारी २ वाजता नियोजित रोप वे संदर्भातील आढावा बैठक (स्थळ: पाली कार्यालय, पाली). दुपारी ३ वाजता वृक्षारोपण कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ: जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान, श्रीक्षेत्र नाणीज, रत्नागिरी). सायंकाळी ४.३० वाजता ग्रुप ग्रामपंचायत शिरगाव येथे सदिच्छा भेट (स्थळ: शिरगाव ग्रामपंचायत, ). रात्रौ सोईनुसार शासकीय विश्रामगृह रत्नागिरी येथे राखीव.

सोमवार दि. २७ जुलै रोजी सकाळी ११ वाजता सिंधुरत्न समृध्दी योजना कार्यकारी समितीची बैठक (स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय,). दुपारी १२ वाजता मराठी भाषा आढावा बैठक (स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय). दुपारी १.३० वाजता रत्नागिरी येथे हस्तकला केंद्र सुरू करण्याबाबत बैठक (स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय). दुपारी २.१५ वाजता खादी व ग्रामोद्योग विभाग आढावा बैठक (स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय). दुपारी ३ वाजता रत्नागिरी जिल्हा मुख्यमंत्री रोजगार निर्मीती कार्यक्रम आढावा बैठक (स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय). दुपारी ४ वाजता रत्नागिरी नगरपरिषद विकास कामांचा आढावा (स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय). सायंकाळी ५ वाजता पत्रकार परिषद (स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय). सायंकाळी ६ वाजता राजिवडा बंधारा व भाट्ये बंदर परिसरातील विकासकामांची पाहणी. रात्रौ सोईनुसार शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे राखीव.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button