
कळंबस्ते परिसरात टेम्पो ट्रॅव्हलर २५ फूट खोल कोसळला
चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते परिसरात रस्त्यालगत असणार्या २५ फूट खोल भागात दापोलीहून पुण्याच्या दिशेने जाणारा टेम्पो ट्रॅव्हलर कोसळल्याची घटना घडली. या ट्रॅव्हलरमध्ये प्रवासी नसल्याने मोठी दुर्घटना टळली. टेम्पो ट्रॅव्हलर दापोलीतून पुण्याच्या दिशेने प्रवासी आणण्यासाठी जात होता.
www.konkantoday.com