
पैसे देऊनही काम पूर्ण केले नाही, आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल
घराचे बांधकाम करण्यासाठी कंत्राटदाराला सामान व पैसे देवूनही त्याने काम केले नाही म्हणून त्याच्याविरूद्ध अलतमश खोत यांनी आरोपी दिलीप चव्हाण (रा.चिपळूण) याच्याविरूद्ध पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. यातील खोत यांनी आपल्या घरासमोर आरसीसी गेट बांधण्यासाठी तसेच पाण्याची टाकी बसविण्यासाठी दिलीप चव्हाण याला कंत्राट दिले होते. त्यासाठी या कामाला लागणारे पैसे त्यांनी चव्हाण याच्या खात्यात वेळोवेळी भरले होते. तरी देखील चव्हाण यांनी हे काम पूर्ण केले नाही. तसेच या ठिकाणाहून घराचे जुने बांधकामाचे साहित्यही घेवून गेला. म्हणून खोत यांनी चव्हाण यांच्याविरूद्ध ९५ हजार रुपये रकमेचा अपहार झाल्याची तक्रार दाखल केली आहे.
www.konkantoday.com