
मानखुर्द येथे बेस्ट बसचा अपघात…
मानखुर्द येथे बेस्ट बसचा अपघात झाला असून, या दुर्घटनेत बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस दुभाजकावर चढली. अपघातात बस चालक, वाहक (कंडक्टर) आणि काही प्रवासी जखमी झाले असून, दुर्दैवाने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. सर्व जखमींवर गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या पार्श्वभूमीवर मुंबईचे उपमहापौर मा. श्री. संजय घाडी हे आज दुपारी 1.30 वाजता गोवंडी शताब्दी रुग्णालयाला भेट देऊन जखमींची विचारपूस करणार आहेत.




