CJP कडून देशव्यापी आंदोलनाची हाक; सोनम वांगचुक यांना जंतर-मंतरवरून हलवल्यानंतर अभिजीत दिपकेंचा मोठा निर्णय

  • गेल्या २१ दिवसांपासून शांततेत सुरू असलेल्या जंतर मंतर येथील बेमुदत उपोषणाला आज वेगळं वळण लागलं. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सोनम वांगचुक यांनी उपोषण केले, परंतु, पोलिसांनी आज त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल केलं. कोणतीही पूर्वसूचना न देता पोलिसांनी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात त्यांना हलवलं आहे. पोलिसांच्या या कृतीमुळे कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी संताप व्यक्त केला असून त्यांनी आता देशभर आंदोलनाची हाक दिली आहे. यासंदर्भातील त्यांनी व्हिडिओ शेअर केला आहे.

वांगचुक आणि त्यांचे समर्थक आंदोलन करत असलेल्या जंतरमंतर मैदानाभोवती मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात केल्यामुळे प्रचंड गोंधळ उडाला. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओंमध्ये, पोलीस अधिकारी वांगचुक यांना रुग्णालयात नेत असताना पोलीस आणि आंदोलकांमध्ये तीव्र वाद आणि शाब्दिक चकमक झाल्याचं दिसून आलं. विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाल्याचा दावा कॉकरोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून केला जातोय.

अभिजीत दिपके काय म्हणाले?

अभिजीत दिपके म्हणाले, “दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना जंतर मंतर येथून हलवलं आहे. येथे विद्यार्थ्यांवरही लाठीचार्ज करण्यात आलाय. मी फ्रेश होण्याकरता मित्राच्या घरी गेलो होतो. तिथेही मला पोलिसांनी मारून रोखून ठेवलं होतं. मला ताब्यात ठेवण्यात आलं होतं. मला आता सोडण्यात आलं असून जंतर मंतर येथे आम्हाला जाऊ दिलं जात नाहीय.”

कोणतीही पूर्वसूचना न देता पोलिसांनी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात त्यांना हलवलं आहे. पोलिसांच्या या कृतीमुळे कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी संताप व्यक्त केला असून त्यांनी आता देशभर आंदोलनाची हाक दिली आहे. यासंदर्भातील त्यांनी व्हिडिओ शेअर केला आहे.

वांगचुक आणि त्यांचे समर्थक आंदोलन करत असलेल्या जंतरमंतर मैदानाभोवती मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात केल्यामुळे प्रचंड गोंधळ उडाला. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओंमध्ये, पोलीस अधिकारी वांगचुक यांना रुग्णालयात नेत असताना पोलीस आणि आंदोलकांमध्ये तीव्र वाद आणि शाब्दिक चकमक झाल्याचं दिसून आलं. विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाल्याचा दावा कॉकरोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून केला जातोय.

अभिजीत दिपके काय म्हणाले?

अभिजीत दिपके म्हणाले, “दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना जंतर मंतर येथून हलवलं आहे. येथे विद्यार्थ्यांवरही लाठीचार्ज करण्यात आलाय. मी फ्रेश होण्याकरता मित्राच्या घरी गेलो होतो. तिथेही मला पोलिसांनी मारून रोखून ठेवलं होतं. मला ताब्यात ठेवण्यात आलं होतं. मला आता सोडण्यात आलं असून जंतर मंतर येथे आम्हाला जाऊ दिलं जात नाहीय.”

जंतर-मंतरवर लाठीचार्ज नाही, पोलिसांचे स्पष्टीकरण

तर, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केल्याचाही दावा कॉकरोच जनता पार्टीने केला होता. मात्र, हा दावा दिल्ली पोलिसांनी खोडून काढला आहे. नवी दिल्लीचे पोलीस उपायुक्त सचिन शर्मा यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितलं की, आंदोलकांवर कोणताही लाठीचार्ज करण्यात आलेला नाही आणि कोणालाही ताब्यात घेण्यात आलेलं नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि त्यांची प्रकृती तसंच वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला विचारात घेऊन, सोनम वांगचुक यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. तिथं कोणत्याही प्रकारचा लाठीचार्ज किंवा तसले काहीही झालेले नाही.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button