
कोस्टल रोडच्या बोगद्यात चालत्या गाडीला आग लागल्यामुळे वाहतूक विस्कळीत!
मुंबई कोस्टल रोडवरील बोगद्यात बुधवारी दुपारी एका चालत्या गाडीने पेट घेतला. गाडीला आग लागल्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून बोगद्यात शिरलेल्या गाड्या एकाच जागी उभ्या आहेत.
दुपारी १२ वाजून २५ मिनिटांनी आग लागल्याची माहिती मिळाली. या घटनेत अद्याप कुणीही जखमी झालेले नाही.




