दापोली येथे विनयभंगप्रकरणी एसटी वाहकावर गुन्हा


एसटी बसमधून प्रवास करणार्‍या एका १७ वर्षीय विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याप्रकरणी एसटी वाहकाविरोधात वापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत विद्यार्थीनीच्या शेजारी बसलेली एक मुलगी तिचे गाव आल्यावर या बसमधून उतरल्यावर वाहक पुंडलिक शिवाजी केंद्रे (३५) हा पिडीत विद्यार्थीनीच्या जवळ येऊन बसला.
प्रवासादरम्यान त्याने विद्यार्थीनीला तू कुठे उतरणार आहेस असे विचारले. त्यानंतर त्याने वारंवार तिला स्पर्श केला, तेव्हा तिने त्याला दुसरीकडे जाऊन बसण्यासाठी सांगितले. तरीही तो ऐकला नाही. म्हणून ती विद्यार्थीनी त्या सीटवरून उठून दुसरीकडे जाऊन बसली. त्यानंतर वाहक केंद्रे हा पुन्हा तिच्या शेजारी येऊन बसला व त्याने या विद्यार्थीनीला अश्लील हेतूने स्पर्श केल्याचे तिने दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आला असून वाहक पुंडलिक केंद्रे याच्याविरोधात लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण कायद्यानुसार तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम ७५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक ज्योती चव्हाण करत आहेत. दरम्यान वाहक केंद्रे याला अटक करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button