दारूच्या पेगवरून वाद; झोपेत असलेल्या चुलत मेव्हण्याचा दगडाने ठेचून खून


मंडणगड तालुक्यातील शेनाळे घाट परिसरात दारूच्या पेगवरून झालेल्या किरकोळ वादाचे पर्यवसान खुनात झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आली. या प्रकरणी मंडणगड पोलिसांनी प्रकाश गंगाराम वाजे (वय ४०) याला ताब्यात घेतले असून, सडू सखाराम मोकाशी (वय ४२) यांचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सडू मोकाशी आणि प्रकाश वाजे हे चुलत मेव्हणे असून दोघेही एकाच कात कंपनीत काम करत होते. सोमवारी रात्री दारू पिताना पेग कमी दिल्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला होता. या वादाचा राग मनात धरून मंगळवारी पहाटे प्रकाश वाजे याने गाढ झोपेत असलेल्या सडू मोकाशी यांच्या डोक्यात दगड घालून हल्ला केल्याचा आरोप आहे. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मोकाशी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

विशेष म्हणजे, घटना घडल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार न होता तेथेच झोपून राहिल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच विभागीय पोलिस अधिकारी शैलेश सणस यांच्या मार्गदर्शनाखाली मंडणगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. संशयित प्रकाश वाजे याला अटक करण्यात आली असून, पुढील तपास मंडणगड पोलीस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button