प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत कर्मचारी प्रशिक्षण संपन्न..


प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कर्मचारी प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या प्रशिक्षणामध्ये मोहिमेची उद्दिष्टे, लसीकरणाची कार्यपद्धती, लाभार्थी मुलांची नोंदणी, तसेच घरभेटी दरम्यान घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
प्रशिक्षण कार्यक्रमास वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता पवार, डॉ. ऋषीकेश डोके, आरोग्य सहाय्यक डॉ. परशुराम निवेंडकर, श्री. बारिंगे तसेच आरोग्य सहाय्यिका श्रीमती पाडवी यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी पल्स पोलिओ मोहिमेचे महत्त्व अधोरेखित करत शून्य ते पाच वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकापर्यंत पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पोहोचविण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले.
यावेळी सर्व समुदाय आरोग्य अधिकारी (CHO), आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, गटप्रवर्तक श्रीमती अडावं, आशा सेविका तसेच अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रशिक्षणामुळे राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी होण्यास मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button