कोंड उमरे येथे नदीवर अंघोळीसाठी गेलेल्या ९ वर्षीय पुतणीसह चुलत्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू.


संगमेश्वर तालुक्यातील कोंड उमरे येथे शास्त्री नदीत अंघोळीसाठी गेलेल्या ९ वर्षीय पुतणीसह तिच्या 50 वर्षीय चुलत्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी दुपारी घडली. या घटनेमुळे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत असून संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोंड उमरे येथील रहिवासी रमेश कांबळे यांच्या घरी मिरगाची राखण असल्याने त्यांचे भाऊ संतोष कांबळे हे शनिवारी कुटुंबासह गावी आले होते.
संतोष कांबळे यांची ९ वर्षीय मुलगी स्वरा हिने नदीवर अंघोळीसाठी जाण्याचा हट्ट धरल्याने दुपारी सुमारे बारा वाजण्याच्या सुमारास चुलते रमेश कांबळे तिला घेऊन शास्त्री नदीतील टवली डोहात गेले होते.
मात्र बराच वेळ उलटूनही दोघे घरी परतले नाहीत त्यामुळे त्यांचा शोध घेण्यासाठी नातेवाईक नदीकाठी गेले असता स्वराचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला.
ही माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.
त्यानंतर करण्यात आलेल्या शोधमोहीमेत रमेश कांबळे (वय अंदाजे ५०) यांचाही मृतदेह पाण्यात आढळून आला.
घटनेची माहिती मिळताच संगमेश्वर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात पाठवले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button