
युवा विद्यार्थ्यांसाठी नाटळ येथे नोव्हेंबरपासून निसर्ग साहस शिबिर
सौंदर्य अविष्काराचे पंचतत्व या ग्रुपच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवा विद्यार्थी वयोगटासाठी पहिल्या निसर्ग साहस ऍडव्हेंचर्स शिबिराचे आयोजन १ ते ३ नोव्हेंबर या कालावधीत करण्यात आले आहे. शिबिरात गिर्यारोहण, ट्रेकिंग, रॉक क्लायबिंग, रॅपलिंग, व्हॅली क्रॉसिंग आदी साहसी प्रकारांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शिबिरामध्ये प्रवेश विनामूल्य असून आगावू नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.१ ते ३ नोव्हेंबर या कालावधीत होणार्या या शिबिरात १५ ते ५० वयोगटातील स्त्री अथवा पुरूष सहभागी होऊ शकतात. शिबिरासाठी पुर्वानुभवाची आवश्यकता नाही. शिबिरात साहसी प्रकारांबरोबर कॅम्पफायर, आकाशदर्शन, जंगलातील वनस्पती वैभव, पशुपक्षी अवलोकनही नामवंत तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात अनुभवायला मिळणार आहे.
या विनामूल्य शिबिराच्या समारोपापूर्वी निवडक २५ शिबिरार्थीना सह्याद्री घाटमाथ्यावरून कोसळणार्या ३०० फूट उंचीच्या उत्तुंग मुसळा ओझर धबधब्यावरून रॅपलिंग करण्याचा अनुभव मिळणार आहे. संपूर्ण शिबिराच्या मोहिमेचे नेतृत्व सुप्रसिद्ध गिर्यारोहक संशोधक रामेश्वर सावंत करणार आहेत. प्रथम नोंदणी करणार्या शंभर शिबिरार्थींनाच शिबिरात प्रवेश दिला जाणार आहे. इच्छूक विद्यार्थी, युवक, युवतींनी २० ऑक्टोबरपर्यंत नोंदणी करायची आहे. शिबिर समारोपप्रसंगी शिबिरार्थीला प्रशस्तिपत्रक देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी ९४२२३७३३१३ या क्र्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन रामेश्वर सावंत व शिबिराचे प्रमुख कार्यवाह अनंत बोभाटे यांनी केले आहे.