
फुणगुस खाडीभागात परतीचा तुफान पाउस
(फुणगूस:एजाज पटेल)-जोरदार वादळी वारा आणि विजांचा लखलखाट आणि ढगांच्या कडकडाटासह कोसळणाऱ्या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे .अचानक दुपारी एक वाजताच्या सुमारास पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केल्याने याचा परिणाम जनजीवणावर होऊन जनजीवन विसखळीत झाले.ऐन भात कापणीत गुंतलेल्या शेतकऱ्यांच्या कामात अचानक आलेल्या पावसामुळे व्यत्यय येऊन शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.पावसाची सुरुवात होताच नेहमी प्रमाणे संपूर्ण खाडीभागात महावितरण कंपनीची वीज खंडित झाली आहे .