तुकाराम मुंढेंचा गुटखा, पानमसाला विक्रेत्यांना दणका; एकाचवेळी पाच विभागांत ‘सर्जिकल स्ट्राइक’


राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून डॅशिंग आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी कार्यभार स्विकारताच राज्यातील अवैध धंद्यांचे धाबे दणाणले आहेत. प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाल्याविरुद्ध मुंढे यांनी अत्यंत आक्रमक आणि जोरदार मोहीम उघडली आहे.याचाच एक भाग म्हणून काल, २९ मे रोजी प्रशासनाने एकाच दिवसात तब्बल ३३ आरोपींना अटक केली असून २८ आस्थापना सील केल्या आहेत. या धडक कारवाईत लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

​एकाच वेळी ‘सर्जिकल स्ट्राईक’

​आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या थेट निर्देशानुसार, राज्यातील अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी काल एकाच वेळी बृहन्मुंबई, कोंकण, पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या पाच विभागांत प्रतिबंधित गुटखा, पानमसाला विक्रेते आणि नियमभंग करणाऱ्या आस्थापनाविरुद्ध मोठी कारवाई केली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button