लांजा शहरातील हॉटेलमध्ये पर्यटक महिलेचा जेवताना ठसका लागून मृत्यू


लांजा येथे हॉटेलमध्ये जेवण करत असताना अचानक ठसका लागून ८३ वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना लांजा येथे घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मृत वृद्धेचे नाव वसुधा यशवंत फाटक (वय ८३, रा. बाणेर, पुणे) असे आहे. वसुधा यशवंत फाटक या आपल्या शेजार्‍यांसोबत कारने गुहागरहून कुडाळ येथे मुलीकडे जात होत्या. प्रवासादरम्यान त्यांनी लांजा येथील अन्नपूर्णा हॉटेल येथे जेवणासाठी थांबा घेतला होता.
जेवण सुरू असताना त्यांना अचानक जोरात ठसका लागला आणि त्या खाली कोसळल्या. उपस्थितांनी तातडीने त्यांना ग्रामीण रुग्णालय लांजा येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची नोंद पोलिसांत करण्यात आली असून, पुढील कार्यवाही सुरू आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button