खेडजवळ मुंबई-गोवा महामार्गावरील नातू नगर स्टॉप येथे भीषण अपघात; महिलेचा मृत्यू, चार जखमी


मुंबई-गोवा महामार्गावरील नातू नगर स्टॉप येथे गुरुवारी (दि.१४) सायंकाळी सुमारे ५.४० च्या सुमारास भीषण अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याकडेला उभ्या गॅस टँकरला कारची जोरदार धडक बसली.या भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. नादिया इमरान जसनाईक (वय २७) असे तिचे नाव आहे तर अब्दुल अच्चीस जसनाईक (४), सबिया मारूख जसनाईक (३३), सेहरा मारुख जसनाईक (७), इमरान मुरात जसनाईक (४५) हे चार प्रवासी जखमी झाले. हे सर्वजण भोस्ते (ता. खेड) येथील आहेत.

अपघातग्रस्त कार (एमएच ०८-झेड ३६९२) ही मुंबई-गोवा महामार्गावरून जात असताना चालकाचा ताबा सुटला आणि कार थेट रस्त्यालगत उभ्या गॅस कंटेनरवर आदळली. धडक इतकी जोरदार होती की कारचा समोरील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला. खेड १०८ ॲम्बुलन्सने जखमींना तत्काळ भरणे येथील यश हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या भीषण अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button