
तीन संशोधन केंद्रांसोबत दापोली कृषी विद्यापीठाचा सामंजस्य करार
भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली अंतर्गत राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र मांजरी पुणे,पुष्प विज्ञान अनुसंधान निर्देशनालय पुणे आणि राष्ट्रीय अजैविक ताण संस्था बारामती या भारतातील तीन नामांकित संशोधन संस्था आणि डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये दि ११ सप्टेंबर रोजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय सावंत यांच्या अध्यक्षतेखाली सामंजस्य करार करण्यात आला.या तिन्ही संस्थामध्ये संशोधन केंद्रामध्ये उत्कृष्ट संशोधन सुविधा उपलब्ध असल्यामुळे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणाऱ्या पदव्युत्तर व आचार्य अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळुन भविष्यामध्ये विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यास मदत होणार असल्याचे मत कुलगुरू डॉ.संजय सावंत यांनी व्यक्त केले.
www.konkantoday.com