
जि.प. आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेची नूतन पदाधिकाऱ्यांना भेट; आरोग्य विषयांवर सकारात्मक चर्चा
रत्नागिरी : जिल्हा परिषद रत्नागिरीच्या नूतन अध्यक्षा सौ. अस्मिता केंद्रे तसेच उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती विलासजी चाळके यांची जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या वतीने सदिच्छा भेट घेण्यात आली.
या भेटीदरम्यान जिल्ह्यातील आरोग्य सेवेशी संबंधित विविध प्रश्न, अडचणी व सुधारणा याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजना, कर्मचारी वर्गाच्या समस्या तसेच सेवा अधिक प्रभावी करण्याबाबत सकारात्मक संवाद झाला.
नूतन अध्यक्षा सौ. अस्मिता केंद्रे व आरोग्य सभापती विलासजी चाळके यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे तसेच त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
या भेटी वेळी जिल्हाध्यक्ष डॉ परशुराम निवेंडकर, सल्लागार गजानन साळुंखे, जिल्हा कोषध्यक्ष विवेक गावडे रत्नागिरी तालुका अध्यक्ष कमलेश लाकडे, सदस्य संजय साळवी, शिवराज शेट्ये, कमलेश कामतेकर, निलेश पिळणकर, तालुका सचिव महादेव आखाडे, नितीन सुर्वे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख गणेश वाघ उपस्थित होते



