
कासवाच्या संरक्षणासाठी कडक पाऊल
रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनार्यांवर अनियोजितपणे उभारल्या जाणार्या धूप प्रतिबंधक बंधार्यांमुळे सागरी कासवांच्या प्रजननावर परिणाम होत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे कोकण किनारपट्टीवर कोणतेही बांधकाम करण्यापूर्वी कांदळवन कक्षाचे ’ना-हरकत प्रमाणपत्र’ (एनओसी) घेणे अनिवार्य करण्यात आले आहे.
रत्नागिरीतील भाट्ये, नेवरे आणि आडे या कासवांच्या महत्त्वाच्या अंडी घालण्याच्या ठिकाणी उभारण्यात येणार्या संरक्षण भिंतींमुळे कासवांना अडथळे निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले होते. या पार्श्वभूमीवर तज्ज्ञ समितीने किनारपट्टीची पाहणी केली. या समितीत मरीन बायोलॉजिस्ट धनश्री बगाडे, संशोधक मोहन उपाध्ये आणि तज्ज्ञ अभिनय केळसकर यांचा समावेश होता.
पाहणीदरम्यान अनियोजित खडक व भिंतींमुळे कासवे अंडी न घालताच परत जात असल्याचे गंभीर निरीक्षण नोंदवण्यात आले. त्यामुळे कासवांच्या नैसर्गिक अधिवासाचे संरक्षण करण्यासाठी आता बांधकामांवर निर्बंध घालण्यात येणार आहेत. कांदळवन कक्षाच्या सूचनेनुसार, संबंधित प्राधिकरणाने आपल्या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र सागरी मंडळाला स्पष्ट निर्देश दिले आहेत. गणपतीपुळे, माखजन खाडी, संवेदनशील भागांमध्ये कोणतेही राजीवाडा आणि भाट्ये यांसारख्या बांधकाम करण्यापूर्वी कांदळवन कंक्षाची परवानगी आवश्यक राहणार आहे.
www.konkantoday.com




