
संमिश्र वातावरणामुळे राजापुरात आंब्याचे सर्वाधिक नुकसान
आंबा पीक हे वर्षातील नगदी पीक असल्याने शेतकरी वर्गाला आंबा पिकापासून दोन पैसे हातात मिळतात. मात्र यावर्षी आंबा-काजूच्या हंगामाच्या सुरुवातीपासून राहिलेले प्रतिकूल वातावरण आहे यावर्षी थंडीचे प्रमाण कमी, सातत्याने पडणारे धुके, थंडीसोबत दिवसभरातील वाढता उष्मा असे संमिश्र वातावरण असल्याने आंबा बागांमध्ये अपेक्षित फळधारणा झालेली नाही.
रात्री गारवा तर दिवसभर प्रचंड उष्णता असे वातावरण पहायला मिळत आहे. या हवामान बदलामुळे शेतकरी बागायतदारांच्या आंबा उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. अशातच आंबा पीक तोडणीयोग्य होत असताना मागील आठवड्यात सलग दोन दिवस अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली त्यामध्ये ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट करीत गारांसह अवकाळी पाऊस पडला. त्याला सोसाट्याच्या वार्याचीही साथ मिळाली होती. त्यामध्ये आंबा-काजू उत्पादनाचे मोठे नुकसान होताना आंब्याचे २९.९० हेक्टर तर काजूचे २८.१ हेक्टर क्षेत्र बाधित होऊन नुकसान झाले आहे. त्यामध्ये मंडणगड, दापोली, गुहागर आणि रत्नागिरी तालुक्यांमध्ये अद्याप नुकसानीबी नोंद झालेली नाही.
www.konkantoday.com




