खेड दापोली मार्गावर वाहनाने धडक दिल्याने दुचाकी स्वाराचा अपघातात मृत्यू


खेड-दापोली मार्गावर गुरुवारी सायंकाळी फुरूस येथे भीषण अपघात घडून एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेली मुलगी गंभीर फुरूस येथील रहिवासी खामकर हे आपल्या मुलीसह ऍक्टिवा दुचाकीवरून खेडहून फुरूसकडे जात असताना सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की खामकर यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची मुलगी गंभीर जखमी झाली.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी तरुणीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळी पोलीस उशिरा दाखल झाल्यामुळे नागरिकांनी काही काळ रास्ता रोको केल्याचे देखील समोर येत आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला असून एका संशयित वाहनाला ताब्यात घेण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button