
कोकण रेल्वेत प्रवाशाचे पाकिट चोरणाऱ्या आरोपीला अटक
कोकण रेल्वेच्या मंगला एक्सप्रेसमधून प्रवास करणारे मुजमिल अहमद हे प्रवासी गाडीत झोपले असता त्यांच्या सीटजवळ असलेल्या इसमाने त्यांच्या खिशातील पाकीट पळवले या पाकिटात दोन हजार दोनशे रुपये होते. मुजम्मील यांनी शेजारी बसलेल्या प्रवाशाला विचारले परंतु त्याने आपण पाकीट घेतले नसल्याचे सांगितले . गाडी रत्नागिरीत आली असता फिर्यादीने तेथे असलेले रेल्वेचे उपनिरीक्षक रणधीर खांडेकर यांना हा प्रकार सांगितला त्यांनी शेजारी बसलेल्या प्रवाशांची झडती घेतली असता त्याच्याकडे पाकीट सापडले .या प्रकरणी पोलिसांनी राहुल कृष्णा पाल राहणार उत्तर प्रदेश याला अटक केली आहे.
www.konkantoday.com