आयशर टेम्पोवर वडाचे झाड पडल्याने टेम्पोचे नुकसान

राजापूर : रेल्वेस्टेशन रस्त्यावरील दोनिवडे येथील मुख्य थांबा येथील जुनाट वडाचे झाड बुधवारी रात्री उभा करून ठेवलेल्या आयशर टेम्पोवर पडल्याने टेम्पोचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेने राजापूर रेल्वेस्टेशन रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या जुनाट झाडांचा प्रश्न ऐराणीवर आला आहे.

तालुक्यातील विलये येथील श्री. तावडे यांच्या मालकीचा हा आयशर टेम्पो (एमएच ०८ ए ९८३१) असून त्यावर दोनिवडे येथल शरद करगुटकर चालक म्हणून काम करतात. बुधवारी रात्री त्यांनी रस्त्याच्या कडेला टेम्पो उभा करून घरी गेले. दरम्यान बुधवारी रात्री उभा असलेल्या टेम्पोवर जुनाट वडाचे झाड पडले. यामुळे या टेम्पोचे मोठे नुकसान झाले आहे. यापुर्वी या वडाचा काही भाग भर दिवसा रस्त्यावरच पडल्याने या मार्गावरील वाहतून ठप्प झाली होती. यावेळी मोठी जिवीत हानी झाली असती मात्र येथील तरुणांच्या प्रसंगावधनाने हा प्रसंग टळला. मात्र या घटनेने राजापूर रेल्वेस्टेशन रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या जुनाट झांडाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. या रस्त्याच्या दुतर्फा अनेक झाडी असल्याने बाका प्रसंग घडण्याची शक्यता आहे.

याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला काही ग्रामस्थांनी प्रत्यक्ष भेटून व दूरध्वनीवरून माहिती दिली असतानाही या विभागाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. विभागाच्या या कारभाराबाबत ग्रामस्थांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या मार्गावरील जुनाट झाडांमुळा अघटीत घटना घडल्यास याची जबाबदारी सर्वस्वी सार्वजनिक बांधकाम विभागाची राहील असे सांगतांना या मार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा अनेक जुनाट झाडी असून ती तोडण्यात यावी अशी मागणी आता ग्रामस्थांमधून जोर धरू लागली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button