रत्नागिरी शहराजवळील मिरजोळे येथे फिनोलेक्स कॉलेज परिसरात लॅपटॉपची चोरी


रत्नागिरी शहराजवळील मिरजोळे येथील फिनोलेक्स कॉलेज परिसरात एका घरातून लॅपटॉप चोरी झाल्याची घटना उघडकीस आली असून, याप्रकरणी अज्ञात तरुणाविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून कालावधीत घडली. अनोळखी तरुणाने फिर्यादी यांच्या घरात शिरून त्यांच्या परवानगीशिवाय लॅपटॉप चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. संशयित तरुणाच्या अंगात चौकटीचा शर्ट, निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट, पाठीवर मिळालेल्या माहितीनुसार, चिन्मय अजित नाईक (वय २०, रा. फिनोलेक्स कॉलेज शेजारी, मिरजोळे, रत्नागिरी; मूळ रा. गाळेल, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) यांच्या घरातून अंदाजे २५ हजार रुपये किमतीचा जुना लॅपटॉप २ कॉलेजची सॅक होती. त्याची दाढी वाढलेली, केस कुरळे असून तो दक्षिण भारतीय असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी चिन्मय नाईक यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button